छत्तीसगडमध्ये प्रचाराचा शेवटचा दिवस, अमित शाहांचा रोड शो | रायपूर | एबीपी माझा
छत्तीसगडमधील पहिल्या टप्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष आज आपली ताकद पणाला लावतील.. आज भाजपाध्यक्ष अमित शाह आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे रोड शो सुरू आहेत. राजनांदगावमध्ये काल राहुल गांधींनी रोड शो केला, तिथंच आज भाजपाध्यक्ष अमित शाह मुख्यमंत्री रमण सिंह यांच्यासोबत शक्तीप्रदर्शन करत आहेत. छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान १२ नोव्हेंबरला म्हणजे परवा होणार आहे. छत्तीसगडसोबतच राजस्थान, मध्य प्रदेश, मिझोरम आणि तेलंगणातील विधानसभांची निवडणूक होणार आहे.. ११ डिसेंबरला या पाचही राज्यांचा निकाल लागणार आहे.