UNCUT | दोन दिवस भावना आवरता आल्या असत्या, राजीनाम्याची गरज नव्हती, छगन भुजबळ यांची मुलाखत | ABP Majha
"शरद पवार ज्या दिवशी ईडी कार्यालयात जाणार होते, त्याच दिवशी अजित पवार यांनी राजीनामा देण्याची गरज नव्हती. दोन दिवसांनी राजीनामा दिला असता तरी चाललं असतं. त्यांच्या राजीनाम्यामुळे फोकस बदलला," अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत छगन भुजबळ यांनी बाळासाहेब ठाकरेंना अटक, अजित पवार, शरद पवार, ईडी नोटीस या विषयांवर भाष्य केलं.