चेन्नई : करुणानिधींच्या समाधीसाठी जागा कोणती? वाद हायकोर्टात
एम करुणानिधींच्या अंत्यसंस्कारासाठी कुठली जागा द्यायची याची यावरुन मद्रास हायकोर्टात सुनावणी सुरु आहे. अंत्यसंस्कार आणि स्मारकासाठी चेन्नईतील मरीना बीचवरील जागेची मागणी केलीय... तर अण्णा द्रमुकच्या सरकारनं जागा देण्यास नकार दिल्यामुळे या वादावर मद्रास हायकोर्टात सुनावणी सुरु आहे.. दरम्यान, राज्य सरकारनं जागा देण्यास नकार दिल्यानं करुणानिधींच्या समर्थकांनी कावेरी रुग्णालय परिसरात मोठा गोंधळ केला. तर काहींनी पोलिसांनी लावलेले बॅरिगेटसही तोडले. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना समर्थकांवर सौम्य लाठीचार्जही करावा लागला.