चेन्नई : अभिनेता कमल हसन आज नव्या राजकीय पक्षाची स्थापना करणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
प्रसिद्ध अभिनेता कमल हसन आज नव्या राजकीय पक्षाची स्थापना करणार आहे. कमल हसन त्याच्या राजकीय जीवनाची सुरूवात रामनाथपुरम जिल्ह्यातील कामुथी या गावापासून करेल. तामिळनाडूतील मदुरै गावात आज पक्षाच्या झेंड्य़ाचं अनावरण करण्यात येईल. यावेळी कमल हसन उपस्थितांना संबोधित करेल. दरम्यान काल चेन्नईमध्ये कमल हसनचं जोरदार स्वागत करण्यात आलं. कमलने द्रमुकचे अध्यक्ष एम करुणानिधी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. मात्र असं असलं तरी द्रमुकने कमल हसनवर टीका केली आहे. कागद्याच्या फुलांना कोणताही गंध नसतो, ते केवळ एका हंगामात फुलतात, परंतु लगेच कोमेजतात अशा शब्दात द्रमुकने कमल हसनवर निशाणा साधलाय.