गुजरातच्या निकालानंतर भाजपचा शेतकऱ्यांसाठी प्लॅन काय? पाशा पटेल यांच्याशी बातचीत
Continues below advertisement
गुजरातमधील निवडणूकांचे निकाल हे भाजपासाठी अनेक अर्थांनी महत्त्वाचे ठरलेत. या निवडणूकांचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे गुजरात मधील ग्रामीण भागानं काँग्रेसला दिलेली साथ. केवळ शहरी मतदारांच्या जोरावर भाजपाला बहुमत मिळवणं शक्य झाल्याचं चित्र गुजरातेत दिसलं. गुजरात देशातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यांपैकी एक आहे. कापसाला भाजपा सरकारकडून न मिळालेला हमीभाव ही सरकार विरोधातली प्रमुख नाराजी आहे. गुजरातमधल्या कापूस उत्पादकांची जी अवस्था आहे अगदी त्याच परिस्थितीत महाराष्ट्रातला शेतकरीही आहे. गुजरात निकालानंतर ग्रामीण भागाचा समोर आलेला मूड महाराष्ट्र भाजपासाठी धोक्याची घंटा मानली जातेय.
याच पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांविषयीची आपली धोरणं आता बदलणार का आणि २०१९ साठी शेतकऱ्यांसाठी भाजपाचा प्लॅन काय आहे हे सांगण्यासाठी भाजपा नेते आणि राज्य कृषी मूल्य आयोगाचे प्रमुख पाशा पटेल आपल्यासोबत आहेत.