कोलकाता : हसीन जहाचा पहिला नवरा शेख सैफुद्दीनशी बातचीत

Continues below advertisement
कोलकाता : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या अडचणी वाढतच आहेत. महिलांशी अनैतिक संबंध, मारहाण, पाकिस्तानी कनेक्शन आणि मॅच फिक्सिंगसारख्या पत्नी हसीन जहाच्या आरोपांनी शमी स्वतःच ‘बोल्ड’ झाला आहे. कोलकाता पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, तर दुसरीकडे हे षडयंत्र असल्याचा आरोप शमीने केला आहे.

या सर्व प्रकरणात हसीन जहाचा पहिला पती शेख सैफुद्दीनचं स्टेटमेंट समोर आलं आहे. हसीन जहा अत्यंत महत्त्वकांक्षी महिला आहे, असं तो म्हणाला. ''हसीनने मला का सोडलं ते माहित नाही. मात्र ती अत्यंत महत्त्वकांक्षी महिला आहे. सध्या आमच्यात कोणताही संपर्क नाही,'' असंही शेख सैफुद्दीनने सांगितलं.

हसीन जहा आणि शेख सैफुद्दीनने 2002 साली प्रेम विवाह केला होता. मात्र नंतर त्यांचा घटस्फोट झाला. हसीन अभ्यासात अत्यंत हुशार होती, असंही सैफुद्दीनने सांगितलं. दहावीपासूनच सैफुद्दीन तिच्यावर प्रेम करत होता. सैफुद्दीन आणि हसीन यांच्या दोन मुली आहेत, ज्यापैकी एक दहावीत, तर दुसरी सहावीत शिकत आहे.

मुली हसीन जहाच्या संपर्कात असतात, असंही सैफुद्दीनने सांगितलं. पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील सुरी बाजार भागात सैफुद्दीनचं बाबू स्टोर नावाचं स्टेशनरी दुकान आहे.

दरम्यान, या प्रकरणी शमीशी फोनवरुन बातचीत केली, मात्र त्याच्याकडून कोणतंही उत्तर मिळालं नाही, असा दावा हसीनचे वडिल मोहम्मद हुस्सैन यांनी केला. मुलीच्या मदतीसाठी मोहम्मद हुस्सैन कोलकात्याला जाणार आहेत. ते बीरभूम जिल्ह्यातील सुरी बाजार भागातच राहतात.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram