स्केटिंग गर्ल श्रुती कोतवालशी खास गप्पा | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा
भारतात क्रिडाप्रकारांची आणि क्रिडापटूंचीही कमी नाही मागील १०० वर्षात ,२ क्रिकेट वर्ल्डकप, १ हॉकी वर्ल्डकप, २८ ऑलिंपिक मेडल्स, ५०४ कॉमनवेल्थ मेडल्स, ६७१ आशियाई गेम मेडल्स इतकी कमाई भारताच्या खात्यात आहे. पण मागील १०० वर्षांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळण्यापासून एक क्रिडाप्रकार मात्र भारताला सतत हुलकावणी देतोय.. तो म्हणजे रोलर स्केटिंग. परंतु एका ध्येयवेड्या क्रिडापटूनं आईस स्पीड स्केटिंगमध्ये उत्तुंग यश मिळवलं आहे. तीचं नाव श्रुती कोतवाल. श्रुतीनं १९९८ मध्ये वयाच्या अवघ्या ८व्या वर्षी रोलर स्केटिंग शिकायला सुरूवात केली. जवळपास १० वर्ष रोलर स्केटिंग करता करता आईस स्पीड स्केटिंग प्रकारामध्ये तीला गती मिळाली. परंतु भारतात बर्फचं फार नसल्यामुळे स्पीड स्केटिंगला म्हणावं तसं पोषक वातावरण नाही. काश्मीर आमि शिमला सोडल्यास या प्रकारात सरावाची ठिकाणंही नाहीत. पण म्हणून श्रुती हताश झाली नाही. भारताचं नाव उज्जवल करण्यासाठी तीनं भारत सोडला. आणि मागच्या ४ वर्षांपासून कॅनडात ती याचं प्रशिक्षण घेत आहे. तर आज आपल्याशी गप्पा मारायला श्रुती थेट कॅनडातून आली आहे.