Chandrayaan 2 | चांद्रयान 2 च्या प्रक्षेपणाचं काऊंटडाऊन सुरु, पुण्यातील खगोलतज्ञ आणि विद्यार्थ्यांशी गप्पा | ABP Majha

Continues below advertisement

अंतराळात भारताने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. इस्रोच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-2 चं आज प्रक्षेपण करण्यात आलं. श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी चांद्रयान-2 अवकाशात यशस्वीरित्या झेपावलं. चांद्रयान-2 हे पूर्णपणे भारतीय बनावटीचं आहे. भारताची ही दुसरी चंद्रमोहीम आहे. याआधी भारताने 2008 मध्ये चंद्रयान 1 चं प्रक्षेपण केलं होतं. चांद्रयान-2 च्या निमित्ताने 11 वर्षांनी इस्रो पुन्हा एकदा चंद्रावर तिरंगा फडकावणार आहे. सगळं काही यशस्वी झालं तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या पृष्ठभागावर उतरणारा भारत हा जगातील पहिला देश बनेल. चंद्राच्या या भागात उतरण्याचं धाडस अद्याप कोणत्याही देशाने केलेलं नाही.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram