विशेष चर्चा : सरोज खानचं डोकं ठिकाणावर आहे काय?
कास्टिंग काऊच हा फिल्म इंडस्ट्रीमधील अत्यंत धक्कादायक प्रकार.. मध्यंतरी हॅशटॅग मी टू ही चळवळही सोशल मीडियात सुरु झाली होती. नुकतंय नृत्य दिग्दर्शिका सरोज खान सांगलीत एका कार्यक्रमाला आल्या असताना त्यांना याविषयी प्रश्न विचारला त्यावेळी त्यांनी कास्टिंग काऊचच्या समर्थनार्थ वक्तव्य केलं. कास्टिंग काऊचसारखे प्रकार तर बाबा आदम यांच्या जमान्यापासून सुरू आहेत. फिल्म इंडस्ट्री कोणत्याही मुलीवर बलात्कार करून त्यांना सोडून देत नाही, तर त्यांना काम आणि रोजीरोटी पण देते, असं म्हणत कास्टींग काऊचची जणू पाठराखणच केली होती. त्यांनी या विधानाची माफी मागितली, मात्र त्यामुळे कास्टिंग काऊचचं गांभीर्य, यामागची मानसिकता आणि अपरिहार्यता हे दुर्लक्षित करून चालणार नाही