स्पेशल रिपोर्ट : चंद्रपूर : महिलेला भर चौकात विवस्त्र करुन मारहाण, येरगावमध्ये माणुसकीला काळीमा
Continues below advertisement
चंद्रपूर जिल्ह्यात क्षुल्लक कारणावरुन वाद झाल्याने एका गावगुंडाने शेजारी राहणाऱ्या महिलेला विवस्त्र करुन भर चौकात बेदम मारहाण केल्याची घटना उजेडात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंद केला होता. मात्र श्रमिक एल्गार संघटनेने सत्य बाहेर आणल्यावर पोलिसांनी गुन्हे नोंद करत आरोपींना अटक केली.
चंद्रपूरच्या मूल तालुक्यातील येरगाव आठवड्यापूर्वी ही घटना घडली. सात दिवसांपूर्वी पीडित महिला आणि आरोपीची पत्नी यांच्यात क्षुल्लक वाद झाला होता. यानंतर आरोपी प्रभाकर नागपुरेने वादात उडी घेत, आपल्या पुतण्यासह पीडित महिलेच्या घरी धुडगूस घातला. या महिलेला फरफटत मुख्य चौकात आणलं आणि विवस्त्र करुन बेदम मारहाण केली.