चंद्रपूर : प्रसाधनगृहाशेजारच्या डबक्यात भाज्या धुतल्या, भाजी विक्रेत्यांचा व्हिडीओ व्हायरल

Continues below advertisement

चंद्रपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील एक धक्कादायक व्हीडिओ सध्या व्हायरल झालाय.
प्रसाधनगृहाशेजारी असणाऱ्या डबक्यात भाज्या धुतल्या जात असतानाचा हा व्हीडिओ आहे,
शहरातील दाताळा मार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समितीची महात्मा फुले भाजी मंडई आहे.
तिथे हा प्रकार सुरू असल्याची माहिती मिळतेय.
हा प्रकार म्हणजे चंद्रपूरकरांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे.
सध्या पावसाळ्यामध्ये भाज्यांना माती चिकटून येते , ती धुण्यासाठी भाज्या अशाप्रकारे प्रसाधन गृहाशेजारच्याह डबक्यात धुतल्या जातायत.
दरम्यान या बाजार समितीच्या विविध पदाधिकाऱ्यांची याच मार्गावरून ये जा असते मात्र कुणीच या प्रकारावर आक्षेप घेतलेला नाही. मात्र नागरिकांनी मात्र या व्हीडिओ नंतर तिखट प्रतिक्रिया दिल्यात.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram