चंद्रपूर : दुचाकीस्वारांना वाघाने अडवलं, थरार कॅमेऱ्यात कैद
Continues below advertisement
तुम्ही रस्त्याने जात असाल आणि तुमच्या समोर अचानक वाघ आला तर काय कराल... हे सांगण्याचं कारण म्हणजे चंद्रपुरात अशीच एक घटना घडली आहे. दोन युवक दुचाकीवरून जात असताना त्यांच्या समोर अचानक दोन वाघ आले.. आणि दोघेही काही काळ स्वतःचा जीव मुठीत धरून दुचाकीवर होते... हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय...दुचाकीस्वारांच्या मागील झुडुपात एक वाघ दडून आहे तर एक वाघ बाईकच्या पुढे हल्ल्याच्या स्थितीत आहे. दरम्यान वाघ किमान ४ वेळा बाईक स्वारांवर हल्ला करण्यासाठी वाघ सरसावल्याचं व्हिडीओत दिसतंय.. जिप्सीतील पर्यटकांनी वेगानं जिप्सी पुढे नेत दुचाकीस्वारांना वाचवलं. या व्हिडीओतील घटनेचे नेमके ठिकाण स्पष्ट झाले नसले तरी जिप्सीतील व्यक्ती मराठीतून बोलत असल्याने तो विदर्भातील कुठल्यातरी जंगलातील असल्याची शक्यता आहे.
Continues below advertisement