चंद्रपूर : ताडोबा अभयारण्यात पर्यटकांनी अनुभवली माया वाघिणीची दहशत

Continues below advertisement
चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सध्या उन्हाळयामुळे वाघोबांचे दर्शन सुलभ झाले आहे.अशातच हिलटॉप भागातील एका घटनेने मात्र पर्यटक चांगलेच धास्तावले. या भागात माया या वाघिणीने पर्यटक जिप्सी वर नजर रोखून आपला आक्रमक पवित्रा दाखवला. रस्त्यांच्या त्या बाजूला तिला आपल्या बछड्यांसोबत रस्ता पार करायचा होता. त्यामुळे संतापात आलेल्या वाघिणीनं गुरगुरायला सुरुवात केली. त्यामुळे घाबरलेल्या पर्यटकांनी लगेत तिथून गाडी बाजूला केली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram