चंद्रपूर : अस्वलाची वाघाच्या बछड्यावर मात, ताडोबातील जामुनबोडीतील प्रकार कॅमेऱ्यात कैद

Continues below advertisement
वाघ हा जंगलाचा राजा, मात्र या राजाला देखील काही प्रसंगी माघार घ्यावी लागते. याचा नमुना ताडोबामध्ये बघायला मिळाला. जामूनबोडी येथे वाघ आणि अस्वल एकाचवेळी पाणी पिण्यासाठी आले होते. एकमेकांचे परंपरागत शत्रू असलेले हे दोघं एकमेकांशी झुंजले नसते तर नवलचं...अस्वलाने आवाहन देत वाघाशी चक्क दोन हात केले. अखेर वाघ आणि अस्वल यांच्या लढाईत अस्वल शिरजोर झाले. या लढाईत पराभूत झालेल्या वाघाचं वय जेमतेम 2 ते 3 वर्षाच असावं. त्यामुळं त्यानं माघार घेतली असं बोललं जातंय. जंगल सफरीवर असलेल्या पर्यटकांनी वाघ आणि अस्वली दरम्यान घडलेला संघर्षाचा प्रसंग कॅमेऱ्यात कैद केलाय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram