चंद्रपूर : खर्रा आणि 10 रुपयांच्या आमिषानं 3 मुलींवर अत्याचार

Continues below advertisement
चंद्रपुरात तीन अल्पवयीन मुलींवर शाळेजवळील प्रसाधनगृहात अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खर्रा आणि दहा रुपयांचं आमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचार झाल्याचा आरोप आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात विसापूर या गावात हा प्रकार घडला. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.  शाळेच्या बाजूला असलेल्या प्रसाधनगृहात हा प्रकार घडला. या दोन्ही वेगवेगळ्या घटना असून एकाच दिवशी घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

20 वर्षीय सूरज हनवते आणि 50 वर्षीय लालाजी पिंगळे अशी आरोपींची नावं आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram