महाराष्ट्र बंद : चंद्रपूर : आंदोलकांनी आमदारांचं कार्यालय फोडलं

Continues below advertisement
दलित कार्यकर्त्यांनी आता भाजप आमदारांच्या कार्यालयांनाही लक्ष्य केलं. चंद्रपूरचे भाजप आमदार नाना शामकुळे यांचं जनसंपर्क कार्यालय आंदोलकांनी फोडलं. गंज वार्डात असणाऱ्या शामकुळे यांच्या कार्यालयावर आंदोलकांनी हल्लाबोल केला. तर जटपूरा गेट परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतिकात्मक पुतळाही जाळण्यात आला. दुसरीकडे बीड जिल्ह्यातील केज-धारूर मतदार संघाच्या भाजप आमदार संगिता ठोंबरे यांच्या घरावरच आंदोलकांनी जोरदार दगडफेक केली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram