चंद्रपूर : जखमी बिबट्याचा वन अधिकाऱ्यावर हल्ला

Continues below advertisement
चंद्रपुरातल्या लोहारा जिल्ह्यात वन अधिकाऱ्यावर बिबट्यानं हल्ला चढवल्यानं उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला... एका वाहनाच्या ध़डकेत बिबट्या जखमी झाला होता.. बिबट्याच्या पायाला मार लागला होता.. त्याला शोधण्यासाठी वनविभागानं मोहिम सुरू केली..  आज सकाळी बांबूच्या एका झुडुपात बिबट्या विव्हळत होता. त्याला जाळीत पकडण्याचे प्रयत्न झाले. मात्र काही वेळाने त्याला बेशुद्धीकरणाचे इंजेक्शन मारण्याचा निर्णय घेण्यात आला...  ही कारवाई केली जात असताना बांबूच्या झुडुपातून बिबट्याने अचानक समोर आक्रमण केले.  वनविभागाच्या अधिकाऱ्यानं हातात फायबर गार्ड आणि काठीच्या 5 मिनिटं प्रतिकार केला... हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेरात कैद झाला... दरम्यान वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी इंजेक्शन मारून बिबट्याला जेरबंद केलं... 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram