चंद्रपूर : तुफान पावसामुळे बेंबाळमध्ये नवीन पुलाला मोठं भगदाड
Continues below advertisement
चंद्रपूर जिल्ह्यातही पावसाने अक्षरश: थैमान घातलंय. सततच्या पावसामुळे बेंबाळ येथील नवा पुल मधोमध खचलाय. या पुलाला मधोमध अक्षरश: भलंमोठं भगदाड पडलंय. यामुळे चिमूरडून वरारोकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. चौपदरीकरण होत असलेल्या वरोरा-चिमूर मार्गावर बेंबाळ येथे हा पूल बांधण्यात येत होता. तर याच मार्गावरील बोथली येथे पाण्याचा अंदाज न आल्याने एसटी थेट रस्त्यालगच्या खड्ड्यात उतरली. बसमध्ये सुमारे 50 प्रवासी होते त्या सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं. चंद्रपूरातील पोथरा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात 10 ते 11 मजूर फसले आहे. त्यांना वाचवण्यात य़श आलंय. शेतात काम करत असताना अचानक पोथरा नदीला पूर आला आणि हे मजूर अडकले होते.
Continues below advertisement