बेळगाव : चंद्रकांत पाटलांनी कन्नड गाणं गायल्याने मराठी भाषिकांमध्ये नाराजी
Continues below advertisement
कर्नाटक सरकार, सगळे राजकीय पक्ष आणि कन्नड संघटना सीमाप्रश्नाच्या बाबतीत आक्रमक धोरण अवलंबत असताना सीमाप्रश्नाचे प्रभारी मंत्री असणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी तवग गावात कन्नड गीताच्या ओळी गायल्या. त्यामुळे सीमाभागातील मराठी भाषिकांना धक्का बसला आहे.
सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सीमाप्रश्नाच्या दाव्याबाबत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते मंडळींची बैठक घेण्यास चंद्रकांत पाटील चालढकल करत असल्याचा आरोप आहे. मात्र त्यांनी गोकाक तालुक्यातील तवग गावातील दुर्गादेवी मंदिराच्या उद्घाटनाला बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकिहोळी यांच्यासह हजेरी लावली.