स्पेशल रिपोर्ट : चांदोली पर्यटनासाठी सांगलीच्या एसपींकडून दरोडेखोर घुसल्याचा बनाव?
Continues below advertisement
चांदोली व्याघ्र प्रकल्पात वन्यजीवांची हत्या करणारी आणि वनसंपत्तीची चोरी करणारी टोळी लपल्याची माहिती सांगली पोलिसांना मिळाली. मग सर्च ऑपरेशनची परवानगी मागणारं पत्र इस्लामपूरच्या डीवायएसपींनी कराडमधील वन विभागाच्या उपसंचालक विनिता व्यास यांना धाडलं. या पत्राला व्यास यांनी केराची टोपली दाखवली.
पोलिसांच्या सर्च ऑपरेशनला वन विभागानं परवानगी नाकारली. तरीही 9 सप्टेंबरला सांगलीचे पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे 50 अधिकारी आणि 100 कर्मचाऱ्यांसह चांदोली गेस्ट हाऊसवर पोहोचले. मात्र व्यास बाईंनी त्यांना जंगलात एन्ट्री दिली नाही.
Continues below advertisement