चंदीगढ : भगवंत मान यांचा आपच्या पंजाबच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

Continues below advertisement

आम आदमी पार्टीचं पंजाब अध्यक्ष भगवंत मान यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. आज सकाळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अकाली दलाच्या नेते विक्रम मजिठीया यांची माफी मागितली. केजरीवाल यांनी मजिठिया यांच्यावर ड्रग्सच्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा आरोप केला होता.
त्यानंतर भगवंत मान आक्रमक झाले. आणि त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिलाय. ड्रग्ज माफियांविरोधात लढाई सुरुच ठेवेल असंही मान यांनी स्पष्ट केलंय.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अरविंद केजरीवाल यांनी ज्यांच्यावर गंभीर आरोप केलेत. त्या सर्वांची माफी मागणार आहेत. मानहानीच्या गुन्ह्यात अनेक वेळा कोर्टाचे खेटे मारावे लागतात. त्यात वेळ जातो. त्यामुळे सर्वांची माफी मागणार असल्याचं केजरीवाल यांनी म्हटलंय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram