पिंपरी : सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कंपनीचं पार्किंग शेड उडून गेलं
पिंपरी-चिंचवडमध्ये काल झालेल्या पाऊस आणि सुसाट वाऱ्यात एका कपंनीचं पार्किंग शेड उचकटल्याचं पाहायला मिळालं... ज्या पद्धतीने पार्किंगचं शेड उचकटलंय, त्यावरुन वाऱ्याचा वेग किती जोराचा होता याचा अंदाज येऊ शकतो... चाकण एमआयडीसीमधल्या एका कंपनीत ही घटना घडलीय... सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये...