मुंबई : मध्य रेल्वेवर सांताक्लॉझ; चॉकलेट, टोप्या देऊन नियम पाळण्याचं आवाहन
ख्रिसमस जवळ आलेला असताना एक सांताक्लॉज सध्या मध्य रेल्वेवर आढळून येत आहे. तो प्रवाशांना टोप्या आणि चॉकलेट देतोय. इतकंच नाही मध्य रेल्वेवर रेल्वे प्रशासनाकडून अनेकदा जनजागृती मोहीम हाती घेण्यात येते. दिव्यांगांच्या डब्यातून प्रवास करु नका, रेल्वेरुळ ओलांडू नका, महिलांचा डब्यातून प्रवास करु नका असे वारंवार या जनजागृतीमधून सांगितलं जातं. याच जनजागृतीचा एक भाग म्हणून खुद्द सांताक्लॉजमार्फत रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांनी जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेअंतर्गत मध्य रेल्वेच्या स्थानकांवर तसेच लोकल च्या डब्ब्यात जाऊन सांताक्लॉजमार्फत जागृती करण्यात येत आहे.