नवी दिल्ली : जेवणाची गुणवत्ता टिकवण्यासाठी पँट्री कारमधील किचनमध्ये सीसीटीव्ही लागणार
Continues below advertisement
रेल्वेत यापुढं तुम्हाला गुणवत्तापूर्ण जेवण मिळणार आहे...कारण रेल्वेतल्या किचनवर नजर ठेवण्यासाठी यापुढं आर्टिफिशिअल इंटेलिजन्स असणाऱ्या कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. यामुळं जेवणामध्ये कोणकोणते पदार्थ बनवले जात आहेत? जेवणाची पॅकिंग कशी केली जात आहे? कुठं काही चुकीचं घडतं आहे का? याची माहिती मिळणार आहे.
जेवणाचा दर्जा सुधारण्यासाठी आयआरसीटीसीकडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे जेवणातली कमी शोधण्याचं काम ही यंत्रणा करणार आहे. रेल्वेच्या भारतातल्या 16 मुख्य किचन्समध्ये प्रायोगिक तत्त्वावर हे सुरु करण्यात येईल.
Continues below advertisement