नवी दिल्ली : सीबीएसई दहावी परीक्षेचा निकाल जाहीर
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालाचं वैशिष्ट्य म्हणजे 500 पैकी 499 गुण मिळवत एक, दोन नव्हे तर चार विद्यार्थी बोर्डात अव्वल आले आहेत. या चार विद्यार्थ्यांमध्ये तीन मुलींचा समावेश आहे. यावर्षी दहावीचा निकाल 86.70 टक्के लागला. यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे.