मुंबई : एन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायक यांना एसीबीची क्लीन चिट
Continues below advertisement
एन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायक यांना अँटी करप्शन ब्युरोने क्लीन चिट दिली आहे. उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता जमवल्याचा आरोप त्यांच्यावर होता. एसीबीने यासंदर्भात न्यायालयात सादर केलेल्या अहवालात क्लीन चिट दिली. आता दया नायक यांची संपत्ती ही त्यांच्या उत्पन्नाच्या 10 टक्क्यांपेक्षा खाली असल्यामुळे त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल करता येणार नसल्याचं एसीबीने म्हटलं आहे.
Continues below advertisement