Scorpio Car Drowned | नदीकाठ ओलांडताना स्कॉर्पिओ कार नदीपात्रात वाहून गेली | पनवेल | ABP Majha
पनवेलमधील देवत गावाजवळ गाढी नदीच्या पात्रात वाहून गेलेली स्कॉर्पिओ गाडी बाहेर काढण्यात आली आहे. स्कॉर्पिओ गाडी नदीचा काठ ओलांडताना नदी पात्रात वाहून गेली. विशेष म्हणजे गाडी वाहून जाण्याची घटना काल संध्याकाळी घडली आहे. यावेळी चालक गाडीत उपस्थित होता. काठ ओलांडताना नदीची पाणी पातळी वाढल्यानं गाडी वाहून जात होती. याचवेळी ग्रामस्थांनी तात्काळ चालकाला बाहेर काढून गाडी जेसीबीच्या साहाय्यानं बाहेर काढली.