मुंबईजवळच्या बुचर बेटावरील इंधनाच्या टाकीला लागलेली आग आटोक्यात, कूलिंग ऑपरेशन सुरु
Continues below advertisement
मुंबई जवळच्या बुचर म्हणजेच जवाहर द्वीपावरच्या तेलाच्या टाकीला लागलेली आग तब्बल तिसऱ्या दिवशी आटोक्यात आली आहे. आग पूर्णपणे विझली नसून काही तासात विझण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र या अग्नितांडवात हजारो लिटर इंधन जळून खाक झालं, तर कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं. शुक्रवारी संध्याकाळी जवाहर ट्विपावरच्या डिझेलच्या टाकीला आग लागली. आगीचं स्वरुप पाहता ती विझवणं शक्य नव्हतं. त्यामुळं टाकीतलं इंधन पूर्णपणे जळेपर्यंत आग तशीच सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. अखेर 48 तासांपेक्षा जास्त वेळ उलटून गेल्यानंतर आग आटोक्यात आली. आगीमुळं तेलाची टाकी समुद्राच्या दिशेनं झुकल्याची माहिती मिळते आहे.
Continues below advertisement