PAYTM गुंतवणूकदारांचं पहिल्याच दिवशी नुकसान, 2150 चा शेअर आला 1560 रुपयांवर
Continues below advertisement
देशातील सर्वात मोठा आयपीओ पेटीएमनं गुंतवणूकदारांना झटका दिलाय. शेअर बाजारात नोंदणी होताच पेटीएमच्या शेअरमध्ये २३ टक्क्यांची घसरण झाली. पेटीएमची प्रवर्तक कंपनी असलेल्या वन-९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या शेअरची आज मुंबई शेअर बाजारात आणि राष्ट्रीय शेअर बाजारात नोंदणी झाली. मुंबई शेअर बाजारात पेटीएमच्या शेअरची नोंदणी १ हजार ९५५ रुपये प्रति शेअरने तर राष्ट्रीय शेअर बाजारात १ हजार ९५० रुपये प्रति शेअरने झाली. शेअर इश्यू करण्यात आला त्यापेक्षा ही रक्कम ९.३ टक्क्यांनी घसरलीय. आयपीओच्या माध्यमातून पेटीएमच्या शेअरची विक्री झाली तेव्हा प्रत्येक शेअर २ हजार १५० रुपयांना विकला गेला होता. पेटीएमच्या शेअरमधील या घसरणीमुळे गुंतवणूकदारांची मोठी निराशा झाली. त्यामुळे मोठ्या फायद्यासाठी गुंतवणूकदारांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
Continues below advertisement