कोरोनामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था भरारी घेणार, भारतात अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर 9.5 टक्के राहणार
कोरोना संकटात ब्रेक लागलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेबाबत चांगली बातमी आहे. यावर्षी भारताची अर्थव्यवस्था साडेनऊ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं व्यक्त केलाय. दर पुढच्या वर्षी अर्थव्यवस्थेतील वाढीचा दर साडेआठ टक्के राहण्याचा अंदाज आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था यावर्षी सहा टक्के तर चीनची अर्थव्यवस्था यावर्षी आठ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. या तुलनेत भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर अधिक आहे. कोरोनामुळे गेल्यावर्षी भारतीय अर्थव्यवस्थेत 7.3 टक्के घट झाली होती.