
Union Budget 2025 : Superfast : अर्थ बजेटचा ; अर्थसंकल्पातून कुणाला काय काय मिळालं? 01 February 2025
Union Budget 2025 : Superfast : अर्थ बजेटचा ; अर्थसंकल्पातून कुणाला काय काय मिळालं? 01 February 2025
१२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त, सर्वसामान्य नोकरदार वर्गाला अर्थसंकल्पातून मोठा दिलासा, १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न असलेल्यांना ८० हजारापर्यंतचा लाभ मिळणार.
नव्या करप्रणालीत मोठे बदल, चार लाखांपर्यंत कुठलाही कर नाही, ४ ते ८ लाखांपर्यंत ५ टक्के कर, १६ ते २० लाखांपर्यंत २० टक्के, २० ते २४ लाखांपर्यंत २५ टक्के आणि २४ लाखांच्यावर ३० टक्के कर असणार.
टीव्ही, मोबाईल स्वस्त होणार, अर्थसंकल्पात घोषणा, टीव्ही, मोबाईलचे देशांतर्गत पार्ट स्वस्त होणार असल्याने एलईडी, एलसीडी स्वस्त होणार.
कार घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, इलेक्ट्रिक कार स्वस्त होणार, निर्मला सीतारमण यांची घोषणा.
खेळण्यांच्या क्षेत्रात भारताला ग्लोबल हब बनवण्यात येणार, चामड्याच्या वस्तू बनवणाऱ्यांसाठीही विशेष योजना, चामड्याच्या वस्तू स्वस्त होणार, अर्थसंकल्पात घोषणा.
कस्टम्स ड्युटीतून ३६ महत्त्वाची औषधं वगळली, यामध्ये कॅन्सरच्या औषधांचा समावेश, त्यामुळे कॅन्सरवरील औषधं स्वस्त होणार.
पुढील आठवड्यात नवे आयकर विधेयक मांडणार, अर्थमंत्री सीतारमण यांची घोषणा, नवे कर विधेयक न्याय मार्गावर जाणारं असेल, सीतारमण यांचं वक्तव्य.