
Union Budget 2025 : Nirmala Sitharaman : अर्थ बजेटचा : Superfast News : 01 Jan 2025 : ABP Majha
Union Budget 2025 : Nirmala Sitharaman : अर्थ बजेटचा : Superfast News : 01 Jan 2025 : ABP Majha
नवी दिल्ली : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala sitharaman) यांनी यंदाचा 2024-25 चा अर्थसंकल्प सादर केला. तत्पूर्वी, राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांची भेट त्यांना अर्थसंकल्प टॅब देण्यात आला. अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारमण 8 व्यंदा संसदेत अर्थसंकल्प मांडत आहेत. त्यामुळे, सर्वसामान्य नागरिक ते सर्वच क्षेत्राला त्यांच्याकडून व मोदी सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात (Budget 2025) रेल्वेचं बजेट काय असणार, प्रवाशांना काय सुविधा, सवलती मिळणार याकडे देखील देशाचे लक्ष लागले होते. त्यानुसार, अर्थमंत्र्यांनी रेल्वेचा (Railway) अर्थसंकल्प देखील सादर केला. त्यामध्ये, नव्या रेल्वेगाड्या, बोगी, दुपदरीकरण, मेट्रो आणि वंदे भारत ट्रेनसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वी केंद्र सरकारकडून रेल्वेचं बजेट स्वतंत्रपणे सादर करण्यात येत होतं. मात्र, मोदी सरकारच्या गेल्या काही वर्षात रेल्वे बजेटही नियमित बजेटमधून सादर केले जात आहे. त्यानुसार, आज अर्थमंत्र्यांनी रेल्वे बजेटही त्यातच सादर केले.
मोदी सरकारच्या काळात रेल्वेचं नवं जाळ निर्माण करताना रेल्वे प्रकल्पांना गती देण्यात आली आहे. त्यातच, वंदे भारत एक्स्प्रेस, अमृत भारत ट्रेन, बुलेट ट्रेन, महानगरातील मेट्रो प्रकल्पना अधिक गतिमान करण्यात आल्याचं पाहायला मिळाला. त्यात, आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी तब्बल 1 लाख 38 हजार 35 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर, महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी 6640 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.