Share Market मध्ये Black Monday ,एकाच दिवसात तब्बल 6.79 लाख कोटी रुपयांचं नुकसान
Continues below advertisement
मुंबई : देशातील ओमायक्रॉनच्या भीतीने सलग दुसऱ्या दिवशी शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. आज शेअर मार्केटमध्ये 'ब्लॅक मंडे'चा अनुभव आला असून एकाच दिवसात गुंतवणूकदारांच्या तब्बल 9 लाख कोटीहून अधिक रुपयांचा चुराडा झालं आहे. सेंसेक्समध्ये तब्बल 1189 अंकांची म्हणजे 2.09 टक्क्यांची घसरण झाली आहे तर निफ्टीमध्येही 371 अंकांची म्हणजे 2.18 टक्क्यांची घसरण झाली आहे. जगभरातल्या विविध शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेल्या घसरणीचा परिणाम मुंबई शेअर मार्केटवरही झाल्याचं दिसून आलं आहे.
Continues below advertisement