Share Market : मुंबई शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशीही तेजी, BSE Sensex 60 हजार अंकावर

मुंबई शेअर बाजारात आज सलग तिसऱ्या दिवशीही तेजी पाहायला मिळाली. बीएसई सेन्सेक्स 367 अंकांनी वाढून, तो पुन्हा 60 हजार अंकावर गेला. युरोपीय बाजारांमधल्या सकारात्मकतेमुळे बँकिंग आणि फायनान्स शेअर्समध्ये मोठी खरेदी पाहायला मिळाली. दरम्यान, आज सेन्सेक्स 60 हजार 223 अंकांवर बंद झाला. निफ्टी 120 अंकांनी वाढून 17 हजार 125 अंकांवर बंद झाला. आयटी कंपन्यांच्या शेअर्सची आज अधिक विक्री पाहायला मिळाली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola