बुलडाणा : पीककर्जासाठी बँक मॅनेजरकडून शरीरसुखाची मागणी, स्वाभिमानी संघटना आक्रमक

Continues below advertisement
पीककर्जासाठी बँक मॅनेजरने शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार बुलडाण्यात घडला आहे. महिलेच्या तक्रारीवरुन सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा मॅनेजर आणि शिपायाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांच्या माहितीप्रमाणे, शेतकरी आणि त्याची पत्नी पीककर्जासाठी दाताळातल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गेल्या. तिथं बँक मॅनेजरने कागदपत्रांची चाळणी करुन तुमचा मोबाईल नंबर द्या, अशी सूचना केली. त्यावर संबंधित शेतकऱ्यानं त्याच्या पत्नीचा मोबाईल नंबर दिला. नंतर मॅनेजरने शेतकरी पत्नीसोबत अश्लील संभाषण करत त्यांना शरीरसुखाची मागणी केली.

मोबदल्यात पीककर्जासोबत वेगळं पॅकेजही देण्यात येईल, असा निरोप शिपायामार्फत महिलेला पाठवला. याप्रकरणी मॅनेजर आणि शिपाई या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलिस  फरार आरोपींचा शोध घेत आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram