बुलडाणा | जिल्ह्यात पावसाचा जोर कायम, पैनगंगा नदीला पूर

बुलडाण्यातही पावसाचा जोर कायम आहे. गेल्या २४ तासात झालेल्या मुसळधार पावसामुळं पैनगंगा नदीला पूर आला आहे. त्यामुळं शेलगाव-लोणार रस्ता पाण्याखाली गेला आहे. त्यामुळं अनेक गावांचा संपर्क तुटल्याचं कळतं आहे.
गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यातून पावसानं दडी मारली होती. मात्र गेल्या २ दिवसांपासून इथं मान्सूनराजा चांगलाच बरसतो आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola