बुलडाणा : शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी करणारा बँक मॅनेजर निलंबित

Continues below advertisement
सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या दाताळा शाखेचा मॅनेजर राजेश हिवसे आणि शिपाई मनोज चव्हाण या दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे. अकोल विभागीय कार्यालयानेही ही कारावई केली. बुलडाण्याच्या जिल्हाधिकारी निरुपमा डांगे यांनी कारवाईसंदर्भात माहिती दिली.

दोन्ही कर्मचाऱ्यांविरोधातील हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी निरुपमा डांगे यांनी दिली.

या बॅंक मॅनेजरने या पूर्वी ही असा प्रकार केलाय का, याची आम्ही माहिती घेत आहोत. जनतेला आवाहन आहे की त्यांच्याकडे काही तक्रार असल्यास आम्हाला कळवावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक शशिकुमार मीना यांनी केले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram