Bhendwal Prediction | यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस, भेंडवळची भविष्यवाणी | बुलडाणा | ABP Majha

Continues below advertisement
यंदा पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज भेंडवळच्या भविष्यवाणीत वर्तवण्यात आलाय. तूर, गहू, कापूस, ज्वारी, उडीद, तीळ, हरभरा या पिकांचं सर्वसाधारण उत्पादन होईल पण भाव मिळणार नाही, तर बाजरीला यंदा भावात तेजी मिळेल असं भाकित करण्यात आलंय. शिवाय चाराटंचाईच्या भीतीमुळे बळीराजानं पिकांचं नियोजन करतानाच चाऱ्याचंही नियोजन करण्याता सल्ला देण्यात आलाय. बुलडाणा जिल्ह्यातल्या भेंडवळ गावात ही भविष्यवाणी वर्तवण्यात आलीय.. शिवाय राजकीय सत्ता स्थिर राहण्याचे संकेतही देण्यात आलेत. देशाला आर्थिक संकटांना सामोरं जावं लागू शकतं. शिवाय, परकीय घुसखोरी सुरुच राहणार आहे, तरी भारतीय संरक्षण त्याला चोख प्रत्युत्तर देईल, असंही भाकित मांडण्यात आलंय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram