बुल़डाणा : पीक कर्जासाठी बँक मॅनेजरकडून शरीरसुखाची मागणी
Continues below advertisement
पीककर्जासाठी बँक अधिकाऱ्यानं शेतकऱ्याच्या पत्नीकडे थेट शरिरसुखाची मागणी केल्याचा प्रकार बुलडाण्यात घडला आहे. महिलेच्या तक्रारीवरुन सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखाधिकारी आणि शिपायाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांच्या माहितीप्रमाणे, शेतकरी आणि त्याची पत्नी पीककर्जासाठी दाताळातल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गेले होते. तिथं बँक व्यवस्थापकानं कागदपत्रांची चाळणी करुन तुमचा मोबाईल नंबर द्या, अशी सूचना केली. त्यावर संबंधित शेतकऱ्यानं त्याच्या पत्नीचा मोबाईल नंबर दिला. नंतर शाखाधिकाऱ्यानं शेतकरीपत्नीसोबत अश्लील संभाषण करत त्यांना शरीरसुखाची मागणी केली.
Continues below advertisement