VIDEO | अनधिकृत बांधकामाच्या कारवाईदरम्यान इमारतीचा भाग कोसळला | नागपूर | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा
नागपूरच्या सीताबर्डी भागात अनधिकृत दुकानांवर कारवाई सुरु होती. या कारवाईदरम्यान एक इमारत पत्त्यांप्रमाणे कोसळली. ही इमारत अर्धी पाडण्यात आली होती. तर उर्वरित इमारत पाडण्याचं काम सुरू असतानाच ही इमारत कोसळली. या अपघातात सुदैवाने कुणीही जखमी झालं नाहीए. तिथे काम करत असलेल्या पोकलँड मशीनची डिझेलची टाकी फुटल्याने सर्व डिझेल वाहून गेलं. सीताबर्डीतील मुंजे चौक परिसरातील मोक्याच्या जागेवर असलेल्या दुकानाविरोधात ही कारवाई सुरू आहे.