VIDEO | अंतरिमऐवजी आता पूर्ण अर्थसंकल्प लिहावा लागणार- सूत्र | नवी दिल्ली | एबीपी माझा
मोदी सरकार यंदा अंतरिम नाही तर पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सरकारमधील अर्थसंकल्पाशी निगडीत सदस्यांना अंतरिम अर्थसंकल्पाऐवजी पूर्ण अर्थसंकल्प असं लिहिण्याच्या सूचना दिल्या गेल्याचं कळलं आहे. त्यामुळे यावरुन तरी, सरकार निवडणुकांच्या तोंडावर मोठ-मोठ्या घोषणा करण्याची चिन्हं दिसत आहेत. तरी, याआधीच काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी अर्थसंकल्पाविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत.