अर्थ बजेटचा 2018 : केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका, राहुल गांधींचं ट्विट
Continues below advertisement
2019 च्या लोकसभा निवडणुकीची सराव परीक्षा म्हणून ज्याकडं बघितलं जात होतं, त्या केंद्रीय बजेटची पोतडी अर्थमंत्री अरुण जेटलींनी फोडली. केंद्र सरकारने शेतकरी वर्ग आणि ग्रामीण भागाला खूष करणारा अर्थसंकल्प मांडला आहे. शेती आणि ग्रामीण क्षेत्रासाठी अनेक योजना जाहीर करताना घसघशीत तरतूदही केलीय. तर मध्यमवर्ग आणि नोकरदारांच्या हाती निराशेशिवाय काही आलं नाही. टॅक्स स्लॅबमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. मात्र त्यावेळी सेस 3 टक्क्यांवरुन 4 टक्के केलाय. तसंच कस्टम ड्यूटीतही वाढ करण्यात आल्यानं तुम्हाला खिसा आणखी रिकामा करावा लागेल. चैनीच्या वस्तूंची खरेदी करताना, हॉटेलिंग करताना तुम्हाला मोदींची आठवण नक्की येईल. तर दुसरीकडे सरकारनं पेट्रोल-डिझेलवरील अबकारी कर कमी केला मात्र त्याचवेळी सेस वाढवल्यानं पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार नाही
Continues below advertisement