कर्जबुडव्या विजय मल्ल्याला ब्रिटन न्यायालयाचा झटका
Continues below advertisement
9 हजार कोटींचं कर्ज बुडवून पळ काढणाऱ्या विजय मल्ल्याला ब्रिटनच्या न्यायालयानं मोठा झटका दिला.... भारतीय स्टेट बँकेसह अन्य 13 बँकांच्या गटाला जवळपास 1 कोटी 81 लाख परत देण्याचे आदेश दिलेत... ब्रिटन न्यायालयातील न्यायाधीश अँड्र्यू हेन्शॉ यांनी गेल्या महिन्यातच माल्याची संपत्ती सील करण्याचा आदेश बदलण्यास नकार दिला... मात्र, माल्ल्यानं कर्ज घेतलेल्या बँकांना त्यांचे पैसे परत करण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत... यावेळी कोर्टानी बँका आणि मल्ल्यानी दोघांनी एक विशिष्ट रक्कम ठरवावी, जी मल्ल्यानं बँकांना परत करावी, असं म्हटलंय...
Continues below advertisement