Kalyan Traffic Issue | कल्याणमधील पूलकोंडीवर मनपा सभापतींचं रेल्वेकडे बोट | कल्याण | ABP Majha
Continues below advertisement
कल्याण डोंबिवलीतले महत्त्वाचे पूल धोकादायक बनल्यामुळे नागरिकांची पूल कोंडी झाली आहे. यामुळे सर्वत्र महापालिकेवर टीका होत आहे. मात्र या परिस्थितीला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचं सभापतींनी म्हटलंय आहे. पूल पाडण्यासाठी रेल्वेचे अधिकारी भ्रष्टाचार करतात असा सनसनाटी आरोप स्थायी समितीचे सभापती दीपेश म्हात्रे यांनी केला आहे. डोंबिवलीतला कोपर पूलही धोकादायक बनल्याचं सांगत २८ ऑगस्टपासून हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यावरुन वातावरण तापलंय.
Continues below advertisement