ब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पर्यावरण दिवस : पर्यावरणासाठी झटणाऱ्या चिदंबर शिंदेंशी बातचीत

Continues below advertisement
आज पाच जून अर्थात जागतिक पर्यावरण दिवस. 5 जून 1972 ला बदलत्या हवामानाविषयी स्टॉकहोम इथे पहिलं विचारमंथन झालं. तेव्हापासून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. आज प्लॅस्टिकच्या अतिवापराने होणारी पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. यातलाच एक प्रयत्न आहे कोल्हापूरच्या चिंदबर शिंदे यांचा.

त्यांनी रद्दी पेपरच्या माध्यमातून विविध गृहोपयोगी वस्‍तू साकारल्‍या आहेत. चिदंबर यांनी अगदी पेन आणि कुंकवाच्या करंड्यापासून ते चटई आणि फ्लॉवरपॉटसारख्या 50 ते 60 प्रकारच्या वस्तू साकारल्या आहेत. आज पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरणाच्या रक्षणासाठी झटणाऱ्या या युवकाशी आपण गप्पा मारणार आहोत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram