ब्रेकफास्ट न्यूज : ज्ञानपीठविजेते साहित्यिक गिरीश कर्नाड हल्लेखोरांच्या निशाण्यावर
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, ज्येष्ठ नाटककार आणि साहित्यिक गिरीश कर्नाड हे गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक झालेल्या संशयितांच्या हिटलिस्टवर होते. विशेष तपास पथक अर्थात एसआयटीनं केलेल्या चौकशीतू ही माहिती पुढे आली आहे. कर्नाड यांच्यासह बी टी ललिता नाईक, निदुमामिडी मठाचे वीरभद्र चन्नामला स्वामी आणि विचारवंत सी एस द्वारकानाथ हे देखील त्यांच्या हिटलिस्टवर असल्याची माहिती समोर येते आहे.