ब्रेकफास्ट न्यूज : 'शतजन्म शोधताना'च्या निमित्ताने नेहा राजपाल, देवेंद्र भोमे यांच्याशी गप्पा

Continues below advertisement
काही संगीतकार अशा गाण्यांना जन्म देतात जी गाणी पिढ्यान् पिढ्या, अगदी जन्मोन जन्म ऐकाविशी वाटतात..आपल्या संगीत क्षेत्रातील असंच एक महत्वाचं आणि आदरणीय नाव म्हणजे श्रीनिवास खळे. खळे काकांची गाणी म्हणजे काय असा प्रश्न विचारला तर गायकाचं वेगळं उत्तर असेल.. आणि श्रोत्याचं वेगळं उत्तर असेल. आणि जर आत्ताच्या काळात खळे काकांची गाणी नव्यानं संयोजित करायची झाली तर संगीत संयोजकांचं त्याहून वेगळंच उत्तर असेल..हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे सध्या यूट्यूबवर रसिकांची भरभरून प्रशंसा मिळवणारी वेब सिरीज शतजन्म शोधताना..

आपल्याला सांगेतिक वारसा देऊन गेलेल्या संगीतकारांचा प्रवास नव्यानं उलगडणाऱ्या या वेब सिरीजला सध्या भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आणि यावेळेस यामध्ये प्रवास उलगडला आहे संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या सांगेतिक प्रवासाचा.. हे आव्हानं ज्यानं पेललंय तो संगीत संयोजक आणि शजतजन्म शोधतानाची संकल्पना आणि दिग्दर्शन ज्याचं आहे तो देवेंद्र भोमे आपल्यासोबत आहे. तसंच खळे काकांच्या गाण्यातलं सौंदर्य ओळखून जिचा सुरेल आवाज शतजन्म मध्ये ऐकायला मिळतो ती प्रसिद्ध गायिका नेहा राजपाल आपल्यासोबत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram