ब्रेकफास्ट न्यूज : नाट्यसंमेलनात जीवन गौरव पुरस्कार, अभिनेते रमेश भाटकर यांच्याशी गप्पा
Continues below advertisement
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतलं परिचीत आणि प्रसिद्ध नाव अर्थात रमेश भाटकर. 98 व्या नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला जाणार आहे. रमेश भाटकरांनी मोठ्या पडद्यासोबत स्मॉल स्क्रीनवरही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. रमेश भाटकरांनी साकारलेल्या पोलिस इन्स्पेक्टरच्या भूमिका प्रचंड गाजल्या आहेत. कमांडर आणि हॅलो इन्स्पेक्टर या त्यांच्या मालिकांना प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली.
त्यांनी जवळपास 100 चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. माहेरची साडी, अष्टविनायक, दुनिया करी सलाम हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. तर अश्रूंची झाली फुले या नाटकात त्यांनी 28 वर्षे भूमिका साकारली. नाट्यसंमेलन आणि त्यांच्या आजवरच्या अभिनयाच्या प्रवासाविषयी गप्पा मारणयासाठी स्वतः रमेश भाटकर आपल्यासोबत आहेत