ब्रेकफास्ट न्यूज : रायगडमध्ये मुसळधार पाऊस, भोगावती नदीत दोन तरुण बुडाले

Continues below advertisement
रायगडमध्ये झालेल्या दमदार पावसात 2 जण वाहून गेले. पेण शहराजवळच असलेल्या भोगावती नदीत 2 तरुण बुडाले. त्यापैकी एकाचा मृतदेह सापडला आहे. 19 वर्षीय अनिकेत वास्कर असं मृत तरुणाचं नाव आहे तर 23 वर्षीय सागर वाघमारे याचा शोध सुरु आहे.

तरुणाच्या शोधासाठी रेस्क्यू टीमकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान कालपासूनच रायगडमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. श्रीवर्धन, महाडसारख्या परिसरात जागोजागी पाणी साचलेलं पहायला मिळालं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram