ब्रेकफास्ट न्यूज : टाटांच्या धरणाच्या राष्ट्रीयीकरणाची मागणी करणाऱ्या प्रफुल्ल कदम यांच्याशी संवाद
Continues below advertisement
पुणे जिल्ह्यातल्या टाटा पॉवर कंपनीच्या मालकीची सहा धरणं सरकारनं तातडीनं ताब्यात घ्यावीत, या धरणांमधल्या पाण्यावर टाटांनी खासगी हक्क दाखवू नये आणि त्याचं राष्ट्रीयीकरण करावं, अशी मागणी पाणी चळवळीचे कार्यकर्ते प्रफुल्ल कदम करत आहेत. या चळवळीचा भाग म्हणून "हे पाणी आमचं..." हे पुस्तकही नुकतंच प्रकाशित करण्यात आलं. नक्की हा प्रश्न काय आहे आणि त्याचा फायदा मराठवाडा आणि विदर्भाला कसा होईल, याबाबत पाणी चळवळीचे कार्यकर्ते आणि अभ्यासक प्रफुल्ल कदम यांच्याशी साधलेला संवाद
Continues below advertisement